काल १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची ३८१ वी जयंती होती. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी मंदिरात 'निर्मिती शिवकल्याण राजाची' हा कार्यक्रम सादर केला गेला. साधारण ३६ वर्षापूर्वी पंडित हृदयनाथ मंगेशकर , लता दीदी आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एकत्र येऊन महाराजांच्या जीवनावरील प्रसंगांवर आधारित गीतांचा आणि इतिहासाचा संग्रह करून ' शिवकल्याण राजा ' हि ध्वनिफीत काढली.समर्थ रामदास, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, कविराज भूषण , शंकर वैद्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गीते , पंडितजींचे संगीत , दीदींचा आवाज आणि बाबासाहेबांचे शिवकथन असा अमृततुल्य योगातून निर्माण झाला 'शिवकल्याण राजा'
माझ्या तर्फे एक छोटासा प्रयत्न म्हणून संपूर्ण शिवकल्याण राजा मी शब्दरुपाने येथे द्यायचा प्रयत्न करतोय.
No comments:
Post a Comment